“मुख्यमंत्री ठाकरेंना त्यावेळी थंडी वाजत होती का?”

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा स्थगन प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थंडी वाजत होती की लाज वाटत होती? असा सवाल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज केला.

कणकवली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा स्थगन प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थंडी वाजत होती की लाज वाटत होती? असा सवाल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज केला. 

पडवे येथील एस. एस. पी. एम. च्या मेडिकल कॉलेज सभागृहात राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधीमंडळात सावरकर गौरव स्थगन प्रस्ताव फेटाळल्याच्या मुद्दयावरून ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा - तिला दहावित आणायचा होता पहिला नंबर...पण शिक्षकानेच देले विष अन्... 

पुढे बोलताना राणे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा गौरव प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला होता; मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी नियमांचा दाखला देत हा प्रस्ताव फेटाळला. वस्तुतः सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मंजूर करण्यात कोणतीच अडचण नव्हती; पण सावरकर गौरव प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. तर सोनिया गांधी यांना वाईट वाटेल, काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यास सरकार कोसळेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरी जावे लागेल या चिंतेमुळे ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणला नाही. सावरकर यांनी 27 वर्षे जेलची सजा देशासाठी भोगली. अन्वनित अत्याचार सहन केले; मात्र गौरवपर अभिवादनाचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला ही गोष्ट दुःखदायक आहे. अशी अनेक उदाहरणे आहे की नियमात नसतानाही अशा गौरव प्रस्तावांवर चर्चा झालेली आहे. देशासाठी त्याग करणार्‍या सावरकर यांच्याबद्दल मात्र सभागृहात चर्चा होत नाही. विधानसभा अध्यक्ष हा विषय नियमात नाही असे सांगतात हे पूर्णतः चुकीचे आहे. सावरकर यांचा गौरव प्रस्ताव फेटाळणार्‍या महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करतो.”

हे पण वाचा - पलूसमध्ये भरदिवसा  उद्योजकावर गोळीबार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan rane criticism on cm uddhav thackeray in mumbai