अलिबाग : ३५ लाखांहून अधिक गणेशमूर्ती रवाना

गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधून आतापर्यंत ४० हजार गणेशमूर्ती विदेशात
गणपती
गणपती sakal

अलिबाग : गणेशोत्सव हा सण अबाल वृद्धांपासून सर्वांच्याच आवडीचा आहे. १० सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी अवघे १८ दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधून आतापर्यंत ३५ लाखांहून अधिक गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत. त्यात ४० हजार गणेशमूर्ती विदेशात पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल ८० टक्के गणेशमूर्ती ग्राहकांपर्यंत पोहचवल्याची माहिती जोहे-हमरापूर येथील मूर्तिकार सचिन समेळ यांनी दिली.

गणपती
चाकरमान्यांना मोठं गिफ्ट; गणेशोत्सवाला धावणार राणेंची 'मोदी एक्स्प्रेस'

गणरायाच्या स्वागताची लगबग आता सुरू झाली आहे. घरांची साफसफाई, रंगरंगोटीची कामे वेगात सुरू असून ठिकठिकाणी गणेशाच्या स्वागताची तयारीला लागले आहेत. गणेशमूर्ती ज्या ठिकाणी विराजमान करायची आहे, तो भाग, परिसर नीटनेटका व व्यवस्थित करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. त्या ठिकाणी सजावट कशा पद्धतीने करायची याचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही गणेशमूर्ती सजावटीचे वेगवेगळे साहित्य दाखल होऊ लागले आहे. झुंबरपासून वेगवेगळ्या आकाराच्या रंगाचे तोरणे बाजारात दाखल झाले आहेत. गणेशमूर्तींच्या विक्रीलाही गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. पेणमधील शहरी भागासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती विक्रीचा वेगही वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात २० लाखांपर्यंत मूर्तींची विक्री झाली होती. त्यात आणखी १५ लाखांनी वाढ होऊन आतापर्यंत ३५ लाख गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. ४० हजार गणेशमूर्ती अमेरिका, न्युझीलंड, इंग्लड आदी देशांमध्ये रवाना झाल्या आहेत.

गणपती
कणकवली : सप्टेंबरपर्यंत ८० टक्के बसेस धावणार

"आतापर्यंत ३५ लाख गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. आता फक्त बुकिंग केलेल्या किरकोळ ग्राहकांच्या मूर्ती शिल्लक आहेत. पाच, दोन दिवस अगोदर अथवा गणेशोत्सवाच्या दिवशी गणेशमूर्ती घेऊन जातील. यंदा सरकारकडून वेळेवर नियम लागू न झाल्याने त्याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. त्यामुळे यंदा शाडूऐवजी पीओपी मूर्तीला अधिक पसंती दर्शवण्यात आली; पण शाडूच्या मूर्ती तशाच पडून आहेत."

- सचिन समेळ, मूर्तिकार

गणपती
'आता पुढचा नंबर अनिल परबांच्या रिसॉर्टचा'

८०० कारखानदार आर्थिक संकटात-

पीओपीऐवजी शाडू मातीच्या मूर्तीला यंदा मागणीची शक्यता आणि सरकारकडून त्या पद्धतीने निर्णय जाहीर केले जाईल. त्यामुळे पेण येथील असंख्य कारखानदारांनी शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे काम केले. आतापर्यंत १० लाख मूर्ती तयार करण्यात आल्या. परंतु, कोणत्या प्रकारच्या मूर्ती तयार करायच्या याचा निर्णय सरकारकडून वेळेवर न आल्याने वजनाने हलक्या आणि रेखीव; तसेच किमतीने कमी असलेल्या पीओपी मूर्तींना ग्राहकांकडून मागणी वाढली.

त्यामुळे कारखानदारांची तारांबळ उडाली आहे. पीओपीची मूर्ती ग्राहकांना मागणीनुसार पोहचवण्यासाठी कारखानदारांनी दिवसरात्र मूर्ती तयार केल्या. दीड महिन्यापूर्वी पीओपी मूर्ती तयार करण्यासाठी मालच उपलब्ध नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पीओपी मूर्तीला मागणी असल्याने शाडूच्या मूर्तीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्याचा फटका पेणमधील सुमारे ८०० मूर्ती कारखानदारांना बसल्याची माहिती कारखानदार सचिन समेळ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com