कणकवली : सप्टेंबरपर्यंत ८० टक्के बसेस धावणार

गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यासाठी नियोजन
st
stesakal
Updated on

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग (sundhudurg) विभागाने गणेशोत्सवासाठी पूर्ण क्षमतेने बसेस सोडण्याबाबतचे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत जवळपास ५० टक्केपर्यंत फेऱ्या सोडण्यात येत आहेत; मात्र शालेय व बेळगाव, पणजीकडे जाणाऱ्या बसेस बंद आहेत.

१ सप्टेंबरपर्यंत ८० टक्के फेऱ्या पूर्ववत करण्याचे नियोजन आहे; परंतु भारमान पुरेशा प्रमाणात नसल्याने तसेच डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे काही अडचणी येत असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सुमारे २१०० फेऱ्या सुटत होत्या. पैकी पणजीकडील ३६ व बेळगावकडील २० फेऱ्‍या बंद आहेत. त्या राज्यांकडून बसेसना अद्याप परवानगी नाही; मात्र इतर ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्याचे नियोजन सुरू असून काही प्रमाणात बसेस सोडण्यात येत आहेत; मात्र अजूनही अपेक्षित भारमान नाही. डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्‍वभूमीवर तोटा होत असला तरीही बसेस सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

st
चाकरमान्यांना मोठं गिफ्ट; गणेशोत्सवाला धावणार राणेंची 'मोदी एक्स्प्रेस'

गणेशोत्सवापर्यंत शालेय फेऱ्या वगळता इतर बसेस सोडण्याबाबतचे नियोजन केले आहे. या सर्व फेऱ्या सोडण्याबाबतची कार्यवाहीही सुरू आहे. १ सप्टेंबरपर्यंत ८० टक्के फेऱ्या सुरू होतील. गणेशोत्सव कालावधीत स्थानिक पातळीवर प्रवासी उपलब्धतेनुसार जादा बसेस लागल्या तरीही त्या सोडण्याबाबतचे नियोजन केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सावंतवाडी येथून उद्यापासून ग्रामीण, वस्तीच्या बसफेऱ्या

येथील आगारातून सोमवारपासून (ता.२३) ग्रामीण फेऱ्या व ग्रामीण वस्तीच्या फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगर प्रमुख वैभव पडोळे यांनी केले.

st
...म्हणून 'CAA' आवश्यक होता; केंद्रीय मंत्र्याचं अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य

आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण फेऱ्या अशा : सावंतवाडी - दोडामार्ग : ०७:०० (मुळस), ०८:०० (केर), ०९:००, १०:१५, ११:०० (फणसवाडी-मांगेली), ११:३० (मुळस), १२:३०, १४:००, १७:१५ (मुळस), १८:३० (झरेंबाम्बर). सावंतवाडी - शिरोडा :- ०७:००, ०८:००, ०९:४५, ११:००, १२:१५, १३:३०, १५:००, १७:००, १८:१५. सावंतवाडी - आंबेगाव :- ०८:००, ११:००, १२:३०, १७:००. सावंतवाडी - गोठवेवाडी : ०८:००, ०८:३०, १३:००, १७:००. धोंडवाडी : १२:०० सावंतवाडी - शिवापूर : ०७:३०, १३:३०, १७:३०. दुकानवाड :- ११:३०, १५:३०. हिर्लोक : ०९:३०, सावंतवाडी - पारपोली : ०७:३०, ०९:३०, १२:००, १४:१५. वेर्ले : ०७:००, १२:१५, १६:००. सोनुर्ली : ०९:३०, ११:३०, १४:३०. आरोंदा : ०९:३०, १३:००,

१९:१५. कालिका मंदिर : ०७:२०, ०९:३०, १३:३०. कुडासा : १३:००, १६:००, १८:३०. घारपी : १४:००, १८:००. विठ्ठलवाडी : १२:००. सावंतवाडी - कुणकेश्वर कुडाळ मालवण मार्गे : १५:४५, आदी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण वस्तीच्या शिवापूर, मांगेली-फणसवाडी, घारपी, आरोंदा, झरेंबांबर, गोठवेवाडी, कुंभावडे, कुडासा, कुणकेश्वर, मुळस, शिरोडा, आजरा या बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आगाराने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Best time to visit Savatkada Waterfall Rajapur
₹1 crore houseboat lying abandoned
Wildlife Conservationist Dr. Prasad Dabholkar Named Honorary Wildlife Warden for Raigad District
Uday Samant Operation Tiger latest news
Marathi News Esakal
www.esakal.com