अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार- अजित पवार

पूरपरिस्थितीवर उपाययोजनांसाठी अजित पवार यांचे आदेश
अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार
अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणारsakal
Updated on: 

अलिबाग : महाड शहरात दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सावित्री नदीतील बेटे आणि गाळ काढण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

या वेळी सावित्री नदीवरील दादली आणि गांधारी नदीवरील पुलांची उंची वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका शहरातील व्यावसायिक, दुकानदारांसह व्यापाऱ्यांना बसला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मदत देण्यात येत आहे. या नुकसानग्रस्तांना मदतीसह इतर योजनांचा लाभ देताना शॉप ॲक्ट परवान्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील इतर व्यावसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार
अलिबाग : ’उमटे’तील पाण्यासाठी दिवाळीनंतर मुहूर्त

बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते.

लिलाव प्रक्रिया अपूर्ण

मेरिटाईम बोर्डाने पाठवलेल्या सर्वे अहवालानुसार सावित्री नदीच्या पात्रात साधारण एक लाख ४३ हजार ब्रास वाळू साठा आहे. याची किंमत ३४ कोटी ९२ लाख रुपये आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा गाळ अद्याप काढण्यात आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jaigad-Chiplun-Satara Expressway
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Marathi News Esakal
www.esakal.com