बेडरुमध्ये बायको, दोन मुलांना मारुन तो हाॅलमध्ये आल्यानंतर त्याने...

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 मार्च 2020

दांपत्‍यासह दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले.म्‍हापशातील प्रकार; कुटुंब गडहिंग्लज तालुक्‍यातील नेसरीचे..

म्हापसा (रत्नागिरी) : खोर्ली म्हापसा येथील मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या ‘गॉड्‌स गिफ्ट’ या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधील शाहू धुमाळे तसेच त्यांची पत्नी व दोन मुले अशा एकूण चार जणांचे मृतदेह म्हापसा पोलिसांना आज सकाळी आढळून आले. 
खासगी सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या धुमाळे यांनी कर्जबाजारी झाल्याने वैफल्यग्रस्ततेतून कुटुंबीयांची हत्या करून स्वत:चाही शेवट केला असावा, असा प्राथमिक अंदाज शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

धुमाळे (वय ४१) यांचा मृतदेह फ्लॅटच्या हॉलमध्ये पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत सापडला. पत्नी कविता (३४) तसेच दोन्ही मुलगे पारस (९) व साईराज (अडीच) यांचे मृतदेह बेडरूममध्ये होते. तिघांच्या मृतदेहांवर गळा आवळून खून केल्याच्या कोणत्याही जखमा नव्हत्या, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. उत्तरीय तपासणीनंतरच त्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.  

हेही वाचा- नाणार वाद पेटला ; भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट....

सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून धुमाळे यांनी

धुमाळे कळंगुट येथे काम करीत होते. ते मूळचे नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. बारा वर्षांपूर्वी ते गोव्यात नोकरीसाठी आले होते. ते पत्नी कविता यांना म्हापशात घेऊन आले. सुरवातीला ते पत्नीसह खोर्ली येथे राहत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी खोर्ली येथे गॉड्‌स गिफ्ट इमारतीतील फ्लॅट खरेदी केला होता. 

बॅंकांकडून घेतले कर्ज

हेही वाचा-  सावधान ! रत्नागिरीत 902 वाड्यांना बसणार झऴ...

धुमाळे यांनी काही बॅंकांकडून कर्ज घेतले होते. लोकांकडूनही कर्जाच्या स्वरूपात पैसे घेतले होते. त्यामुळे गॉड्‌स ग्फिट या इमारतीतील स्वत:चा फ्लॅट काही महिन्यांपूर्वी त्यांना विकावा लागला होता. ते आज फ्लॅट रिकामा करून कुटुंबीयांबरोबर भाडेतत्त्वावरील खोलीत राहण्यासाठी जाणार होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all family death in mapusa kokan martahi news