

Mango Alphonso
ESAKAL
Hapus Mango Farmers Protest : फळांचा राजा आणि कोकणातच नव्हे, तर जगभरात ज्याच्या अविट गोडीची चर्चा आहे त्या हापूसच्या मानांकनावरून आता वाद सुरू झाला आहे. ‘कोकण हापूस’वर गुजरातने दावा केला आहे. ‘गुजरात-वलसाड हापूस’ म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली आहे; परंतु २०१८ मध्येच ‘कोकण हापूस’ला कायदेशीर मानांकन मिळालेले आहे. यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न सुरू होते. आता ‘कोकण हापूस’ मानांकन अन्य कोणी वापरणे गैर आहे. हे मानांकन संरक्षित ठेवण्यासाठी वेळप्रसंगी कायदेशीर लढाई लढू, असा इशारा कोकण हापूस उत्पादक व विक्रेते संघाकडून देण्यात आला आहे.