esakal | दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : गेले तीन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा अन्य भागात धुमाकुळ घातला आहे. (konkan rain update) या परिसरात झालेल्या पावसामुळे महापूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने लोकांनी स्थलांतर केले आहे. अनेक घाट प्रदेशात दरड कोसळणे, रस्ते खचणे अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी-कोल्हापूर (ratnagiri-kolhapur) मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे. हा रस्त्यावरील वाहतूक सुरु होण्यास दोन दिवस लागणार असल्याची शक्यता आहे. दरड कोसळून (landslide) रस्ता खचला असल्याने पावसाच्या पाण्याबरोवर माती व दगड रस्त्यावर आले आहेत. बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा: Konkan Railway Update - पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु

loading image
go to top