esakal | उद्यापासून आंबा घाट वाहतुकीस खुला
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यापासून आंबा घाट वाहतुकीस खुला;

उद्यापासून आंबा घाट वाहतुकीस खुला;

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटाची आज दुपारी चाचणी होणार आहे. उद्यापासून अधिकृतरित्या वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्याची तयारी आणि नियोजनही सुरू आहे. गेल्या तेरा दिवसांपासून आंबा घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्ता खचल्याने आणि दरड पडल्याने या आंबा घाटातील वाहतूक २२ जुलैपासून बंद ठेवण्यात आली होती. आंबाघाटात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळली होती.

हेही वाचा: ऐसा देखिला 130 ब्रह्मकमळांचा सोहळा! 4 वर्षांत फुलली शेकडों फुले

दख्खन येथे कोसळलेली दरड फारच मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर या कोसळलेल्या दरडीमुळे या ठिकाणी रस्ताही नादुरुस्त झाला होता. कळपदरा येथे दरीच्या बाजूने असलेला रस्ता साईडपट्टीसह खचून दरीत कोसळला होता. त्यामुळे गेल्या २२ जुलैपासून आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आंबा घाटात कोसळलेल्या सर्व ठिकाणची दरड हटवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नादुरूस्त झाला होता तोही दुरूस्त करण्यात आला आहे. कळपदरा येथे घाटातील अर्धा रस्ता खचून साईडपट्टीसह दरीत कोसळला. त्यामुळे या घाटातील वाहतूक धोकादायक बनली होती.

हेही वाचा: कोकण - जलप्रलयात संपर्काचा दुवा ठरला सॅटेलाईट फोन

वेळीच पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने इतर काही ठिकाणी ज्या दरडी कोसळल्या त्याचा काहीही धोका झाला नाही. आता मात्र हा घाट वाहतूकीस खुला करण्याबाबतची तयारी आणि नियोजन पूर्ण झाले आहे. उद्या अधिकृत घाट सुरू होणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. रस्त्यावर लोखंडी कामं करण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शंका आहे.

loading image
go to top