Raigad Flood Crisis: अंबा नदी स्वच्छतेकडे प्रशासनाचा कानाडोळा; पाटबंधारे- महसूल विभागाच्या ढिलाईवर उपसभापती शेवाळे यांची झोड

अंबा नदीतील अतिक्रमण, गाळ आणि झाडाझुडपांमुळे दरवर्षी वाढणाऱ्या पुरपरिस्थितीवर पाली पंचायत समितीत प्रशासनाला धारेवर; केवळ पंचनाम्यांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
The Pali Panchayat Samiti demanded permanent solutions to recurring floods caused by encroachment and silt accumulation in the Amba River.

The Pali Panchayat Samiti demanded permanent solutions to recurring floods caused by encroachment and silt accumulation in the Amba River.

Sakal

Updated on

पाली : अंबा नदीच्या पात्रातील अतिक्रमण, गाळ, झाडाझुडपे आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे दरवर्षी पुराचे पाणी गावांमध्ये घुसून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पूर ओसरल्यावर केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा प्रशासनाने आता तरी डोळे उघडून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा तीव्र शब्दांत पाली पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मंगळवारी (ता. 14) पाली पंचायत समितीच्या सभागृहात पूरपरिस्थिती आढावा बैठक सभापती जागृती मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com