आंबेरी, चिपी ग्रामस्थांचा वाळू लिलावला विरोध 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

या ठिकाणी निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत मत्सपालन शेती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी आपल्या कर्तव्यतत्पर महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल न मागविता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी.

सिंधुदुर्गनगरी - कर्ली खाडी पात्रातील वाळू पट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहेत; मात्र या प्रक्रियेला मालवण तालुक्‍यातील आंबेरी आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट "ड' व "ई' हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या ठिकाणी निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत मत्सपालन शेती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी आपल्या कर्तव्यतत्पर महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल न मागविता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडू, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वाळू पट्यांचे लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच त्यांचे लिलाव होणार आहेत. यात कर्ली खाडीतील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे; मात्र ही लिलाव प्रक्रिया करताना सागरी महामार्गावरील पुलाजवळ कर्ली खाडीतील गट ड आणि ई अंतर्गत येणाऱ्या उपगटात निसर्ग निर्मित बेटे आहेत. खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत सुरू असलेली मस्त्यपालन शेती येत आहे.

या ठिकाणच्या वाळूचा लिलाव झाल्यास निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे आणि मत्स्य शेतीला घातक ठरणार आहे. त्यामुळे कर्ली खाडीतील वाळू पट्ट्यांचा लिलाव करताना गट ड आणि ई मधील वाळू लिलाव करण्यास मालवण तालुक्‍यातील वाघवणे देवली, आंबरी वाकवाडी आणि वेंगुर्ला तालुक्‍यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट ड व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून याठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या ठिकाणी निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत मत्सपालन शेती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी आपल्या कर्तव्यतत्पर महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल न मागविता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडू असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ किशोर वाक्कर, विरेश मांजरेकर, मनोज वाक्कर, नीलेश मांजरेकर, सदानंद गोरे, दिपक चव्हाण, राजीव नाईक आदी उपस्थित होते. 

अधिकाऱ्यांकडून दिखावू कारवाई 
कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर महसुलच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी केवळ बंद असलेले रॅम्पवर कारवाई केली. काही ठिकाणी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून दिखावू कारवाई करण्यात आली; मात्र रॅम्प पुन्हा कार्यरत झाले आहेत. याकडे ते दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप करत याबाबत या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amberi Chipi Villagers Oppose Sand Auction