Anandraj Ambedkar
esakal
आनंदराज आंबेडकर यांनी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाला ठाम विरोध दर्शवला.
देशभरात जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी रिपब्लिकन सेनेची मागणी.
राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलनांचा इशारा.
वैभववाडी : सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली असली तरी या सत्तेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कुठे दिसत नाही. सध्याच्या राजकारणात सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी युतीला पर्याय नाही. त्यामुळे सन्मान आणि सत्तेचा राजमार्ग दाखविणारी युती आम्ही शिंदे शिवसेनेसोबत केली आहे. युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी केले.