Anant Geete : मत विकू नका, कारण मतदान हे पवित्र दान आहे - अनंत गीते

पालीत गीतेंच्या प्रचार रॅली व सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
anant geete over lok sabha poll your vote
anant geete over lok sabha poll your voteSakal

पाली : आपले मत विकू नका, कारण मतदान हे पवित्र दान आहे. असे आवाहन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केले. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सुधागड पाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गीते यांच्या उपस्थित मंगळवारी (ता.30) पाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लिमये हॉल पर्यंत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती.

तसेच लिमये सभागृहात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत गीते बोलत होते. सर्वप्रथम उमेदवार अनंत गीते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करून प्रचार रॅलीला सुरूवात केली.

यावेळी पाली शहरासह तालुक्यातील नागरिकांना मशाल या पहिल्या चिन्हा समोरील बटन दाबून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सुधागड तालुका इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

या प्रचार रॅलीला व सभेला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अनंत गीते म्हणाले की, सुधागड तालुक्यातील मतदार मला विक्रमी मतांनी विजयी करेल असा विश्वास आहे.

आपले मत विकू नका, कारण मतदान हे पवित्र दान आहे. आणि तालुक्यातील जनता निश्चितपणे मत दान करतील आणि तो दान अनंत गीतेंच्याच पारड्यात पडेल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

जयंत भाई, मधुकर ठाकुर, यांच्यासह उल्काताई महाजन म्हणतात गोरगरीब आदिवासी बांधवांचा देखील तटकरे यांनी विश्वास घात केला आहे. आणि त्यामुळे रायगडचा मतदार विश्वास घातक्याला थारा देणार नाही आणि धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असे देखील गीते म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील,शेकापचे नेते सुरेश खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, शिवसेनेने नेते किशोर जैन, युवासेना महाराष्ट्र विस्तारक सुधीर ढाणे,

शिवसेना जिल्हा संघटक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्क प्रमुख विणेश सितापराव, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, माजी युवासेना जिल्हाधिकारी सचिन डोबले,

युवासेना उपजिल्हा अधिकारी प्रवीण पाटील, विधानसभा अधिकारी किरण पिंपळे, आपचे तालुका अध्यक्ष रायकर, माजी सभापती रमेश सुतार, विभाग प्रमुख किशोर दिघे, आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com