
गेली किमान दहा हजार वर्षे भारतात शेती केली जात आहे. याचे विविध संदर्भ आपल्याला पुरातत्त्व शोधांबरोबरच विविध साहित्यातूनही मिळतात. त्यांच्याबद्दल आपण आजच्या लेखात माहिती करून घेणार आहोत. वेद, उपनिषदे, पुराणे, अरण्यके यासारख्या प्राचीन ग्रंथांमधून शेती आणि पशुपालन यांचे उल्लेख आले आहेत. त्यातच बियाणांच्या विशेषत: तांदूळ आणि आदिमधान्ये यांच्यातील विविधतेचे उल्लेखही आले आहेत. रामायण-महाभारत या ग्रंथांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीची वर्णने आहेत. कृष्ण हा पशुपालक आहे तर बलरामाच्या खांद्यावरील नांगर तो शेतकरी होता हेच दर्शवते आहे. दशावतारातील वामनाच्या गोष्टीतला बळी हा देखील शेतकरीच होता म्हणूनच तर आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टीज्ञान संस्था