Long queues for Ballaleshwar darshan in Pali, Maharashtra: भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंग वाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, छोटे मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते.
Devotees queue up at Pali’s Ballaleshwar temple on Angarki Chaturthi.Sakal
पाली: अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (ता.12) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. पालीत अंदाजे 25 हजार हून अधिक भाविक दाखल झाले होते.