...म्हणून होत आहेत गावात भांडणे....

angry people from the village
angry people from the village

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावात दाखल होणाऱ्या परराज्यातील परजिल्ह्यातील व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विलगीकरण करण्यात येत आहे मात्र या प्रक्रियेला गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून दोन मतप्रवाहामुळे गावात शाब्दिक भांडणे होत आहे. एकुणच यामध्ये सरपंच आणि सनियंत्रण समितीला तोंड द्यावे लागत आहे.


लॉकडाऊन मध्ये मुंबई पुणे परराज्यात अडकलेल्या जिल्हावासीयांना त्यांच्या मुळ गावी परत आणण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने गावागावातील शाळा-महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत. मुंबई पुणे याठिकाणी चाकरमान्यांची मोठी संख्या आहे हे चाकरमानी गावी परतण्यासाठी इच्छुक आहेत मात्र रेड झोन असलेल्या या दोन्ही ठिकाणच्या चाकरमान्यांना गावात घेण्यासाठी मतमतांतरे आहेत काहीजण त्यांनाच स्विकारण्यास तयार आहेत तर काही जणांचा विरोध आहे त्यामुळे प्रशासनही यावर ठोस निर्णय घेताना दिसून येत नाही सध्या ई पास च्या माध्यमातून काही चाकरमाने गावात दाखल होत आहेत.

या चाकरमान्यांना भरवस्तीत असलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये विलगीकरण करून ठेवण्यात येत आहे तालुक्यामध्ये गावागावात अशा पद्धतीने काही माणसे विलगीकरण करून ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावात येणाऱ्या अशा लोकांना शाळेमध्ये विलगीकरण करून ठेवताना त्यांच्या राहण्याची जेवणाची व त्यांच्यावर निगराणीची जबाबदारी सनियंत्रण समितीवर सोपवण्यात आली आहे. या सनियंत्रण समितीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी तलाठी हे शासकीय कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे शिवाय या समितीचा अध्यक्ष म्हणून सरपंच आहे.

समितीचा अध्यक्ष या नात्याने विलगीकरण करून ठेवण्यात आलेल्या या लोकांबाबत निर्णय द्यायचे आहेत. मात्र शासनाच्या आदेशानुसार उभय वस्तीतील शाळांमध्ये मुंबई पुणे किंवा परराज्यातून येणाऱ्या लोकांना विलगीकरण करून ठेवतानाच ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहेत. नावेला जास्त शासन आदेशानुसार या सनियंत्रण समितीला संबंधितांना सुपर वस्तीतील शाळांमध्ये विलगीकरण करून ठेवण्यात भाग पडत आहे.
मुंबई पुणे याठिकाणी कोरोनाचा वाढता पहिला लक्षात घेतात या रेडझोन मधील भागातून आलेल्या लोकांना विलगीकरण करून ठेवण्यात सनियंत्रण समिती नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना नकार दिला आहे. याबाबत अद्यापही कोणती भूमिका जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली नाही आहे. असे असले तरी इतर भागातून येणारे लोक सध्यास्थितीत शाळांमध्ये विलगीकरण मध्ये आहेत. असे असूनही या प्रक्रियेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.

अशा लोकांना गावात जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर ठेवण्यात यावेत असे मागणी होत आहे या लोकांच्या मागणीला सनियंत्रण समितीला तोंड द्यावे लागत आहेत सरपंच या नात्याने लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनेक शाब्दिक चकमकी ही उडत आहेत एकूणच या महामारी च्या संकटात गावागावात द्वेष व भांडणे निर्माण होत आहेत.काही गावातील उदाहरणे लक्षात घेता सनियंत्रण समितीमध्येच ताळमेळ नसल्याने विलगीकरण करून ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या सोयी सुविधा बाबत अडचणी निर्माण झाले आहेत शिवाय निगराणी वरूनही समितीमध्ये खटके उडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण होत असून भर वस्तीतील विलगीकरणास विरोध होत आहे.


शिक्षकांकडून नकार

गावात शाळांमध्ये विलगीकरण करून ठेवण्यात येणाऱ्या लोकांवर निगराणीसाठी शिक्षकांना नियुक्त केले असतानाही आणि तसे आदेश शासनाने दिले असतानाही काही गावात शिक्षकांकडून नकार देण्यात येत आहे त्यामुळे सनियंत्रण समितीलाच हे काम पाहावे लागत असुन सरपंचाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com