प्राण्यांची हत्या करणाऱ्यावर कारवाई गरजेची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यु सर्व्हिस सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने रानडुकरांची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

कुडाळ ( सिंधुदुर्ग  ) : वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यु सर्व्हिस सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने रानडुकरांची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वनविभाग , पोलिस अधीक्षक , जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

25 नोव्हेंबरला मालवण तालुक्‍यातील वेरली या गावातील विहिरीत पडलेल्या रान डुक्करांची अमानुषपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती . या विरोधात आवाज उठवण्यासाठी वाईल्ड लाईफ इमर्जन्सी सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने समाजकंठकाना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी , यासाठी पोलिस अधीक्षक , जिल्हाधिकारी , जिल्हा उपवनाधिकारी समाधान चव्हाण यांना निवेदन दिले. 

 हेही वाचा - न्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता तर बरं वाटलं असते - विजया रहाटकर
 

तस्करीमुळे प्राणी व पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात अलीकडे अंमली पदार्थांची लागवड वाढली आहे. तशातच कोवळ्या वयातील सर्पमित्राची संख्या गल्लोगल्ली बोकाळतेय , त्यांच्या स्टंटबाजीला उत आला आहे . वाघाची कातडी , कासवांची तस्करी , वाघनखे , अजगराची कातडी काही समाजविघातक लोकांकडे आढळल्याच्या बातम्या येतच असतात . दुर्मिळ होत चाललेले प्राणी खवले मांजर , मोर , कासव , सापांच्या काही जाती , इतर वन्य प्राणी यांच्या तस्करीमुळे तर काही प्राणी व पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

हेही वाचा - काचेच्या बाटलीत अवतरलीय ही कलाकृती 

नवीन पिढीसाठी साधन संपत्ती जतन करणे महत्वाचे 

ही सर्व साधन संपत्ती वाचवायची असेल, येणाऱ्या पिढीला असे प्राणी-पक्षी जर दाखवायचे असतील तर त्यांची हत्या आणि तस्करी करणाऱ्या समाजकंटकां विरोधात सरकारने ठोस पावले उचलून अशांना जास्तीत जास्त शिक्षा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला पाहिजे . योग्य वेळी जर शिक्षा झाली तर यापुढे असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही , असे निवेदनात म्हटले आहे.

 उपस्थिती

यावेळी वाईल्ड लाईफ इमर्जन्सी सर्व्हिस सिंधुदुर्ग सस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर , सचिव तुषार विचारे , सहसचिव महेश राऊळ , कमलेश चव्हाण , ओंकार लाड , वैभव अमृस्कर , सुरज मोर्जे , सोमनाथ (नाथा) वेंगुर्लेकर, विष्णू म्हस्के , संजयकुमार कुपकर , चंद्रकांत मेस्त्री , प्रदीप बाणे , प्रभाकर पुजारे आदी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal Killers Deserve Punishment