न्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता तर बरं वाटलं असते - विजया रहाटकर

file photo
file photo

औरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. ही सगळ्यांच्या अंगावर काटा उभी करणारी घटना होती. यामूळे त्या पीडीच्या बरोबर न्याय झाला आहे. अशी सर्वांची भावना आहे. मात्र हा न्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता,तर बरं वाटलं असते. अशी प्रतिक्रीया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्‍त केली. 


राहटकर म्हणाल्या, एन्काऊंटर झाले, ते कसे झाले या बाबतची माहिती पुढे येईलच. पण हा न्याय कोर्टांच्या माध्यमातून झाला असते, तर अधिक बरं वाटलं असते. वर्षांनुवर्षे न्यायालयात चालणारे खटले. होणारा विलंब, या सर्व गोष्टीला आता लोकही वैतागले आहे. लोकांची सहनशिलता कमी होत चालली आहे. त्यामूळे आता तारीक पे तारीक येते. सात वर्षे झाले.

वेळेत लवकर आणि प्रभावी न्याय मिळावेत

निर्भयाची फाशीची शिक्षेची अमंलबजावणी झाली नाही. ज्योती कुमारीची प्रकरणा मध्ये तर तांत्रिक कारणाने ती फाशीच रद्द झाली. त्या आरोपीस जन्मठेप झाली. या सर्व घटना लोकांच्या धीर सोडणाऱ्या आहेत. पण किती दिवस वाट पहायची असे लोकांना वाटतं आहे. न्याय लवकर मिळणे हे गरजेचे झाले आहे. वेळेत लवकर आणि प्रभावी न्याय मिळाले तेव्हाच लोकांचे सहनशीलता (पेशन)टिकेल. असे मला वाटते असेही विजया रहाटकर यांनी सांगितले. 

Video: हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव...

भाजप महिला मोर्चातर्फे हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन 
हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्‍टवर अत्याचार करणाऱ्या चार नाराधामाचा आज एन्काऊंटर झाला. यामूळे पीडीतीला न्याय मिळाल्याची भावना जनसामन्यात आहे. या विषयी भाजप महिला मोर्चातर्फे गुलमंडीवर न्याय मिळवून देणाऱ्या हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले. या माध्यमातून पोलिसामूळे जलद गतीने न्याय मिळाला. आद्यापही निभर्याच्या आरोपीला दिलेली फाशीची शिक्षेची आद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


हा न्याय निसर्गांने दिलेला न्याय 
अमुनाषपणे अत्याचार करीत जाळुन मारलेल्या त्या महिला डॉक्‍टरला आज निसर्गांने न्याय मिळवून दिला आहे. पोलिसांना चकवत पळून जाण्याचा प्रयत्न परतवून लावत त्यांचा एन्काऊंटर होणे काय हा निसर्गांने दिलेला न्याय असल्याची भावना भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष ऍड. माधुरी आदवंत यांनी व्यक्‍त केली. यावेळी लता दलाल, डॉ. सुनीता साळुंके, साधना सुरडकर, जयश्री कुलकर्णी, अर्चना नीळकंठ, शोभा बुरांडे, कल्पना त्रिभुवण, मिरा काळे, ज्योती भिलेगाव, वंदना कुलकर्णी, दिव्या मराठे, ज्योती बनकर, राधा मिसाठ, मिना जाधव, पुष्पा बनकर, गीता कापूरे, मंगल जायभाये, राधा इंगळे, वंदना शाह उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com