पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला बुधवारी (ता. 20) 12 वर्ष पूर्ण झाली. मात्र खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे निवेदन बुधवारी (ता. 20) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली सुधागड शाखेतर्फे समविचारी संघटना व नागरिक यांच्या उपस्थितीत पाली सुधागड तहसीलदारांना देण्यात आले.