अंजनारी घाटात भीषण अपघात, RTOच्या गाडीला ट्रकची धडक; ASIसह दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

Anjanari Ghat Accident हातखंबा महामार्ग वाहतूक शाखेच्या शासकीय वाहनाला लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. अपघातात एका ASI सह ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
अंजनारी घाटात भीषण अपघात, RTOच्या गाडीला ट्रकची धडक; ASIसह दोघांचा मृत्यू, एक जण जखमी
Updated on: 

मुंबई-गोवा महामार्गावर अंजनारी पुलाजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. हातखंबा महामार्ग वाहतूक शाखेच्या शासकीय वाहनाला लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन नदीच्या दिशेने खोल उतारावर जाऊन पलटी झाले. अपघातात एका ASI सह ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Loading content, please wait...