Ratnagiri: आंजर्ले तरीबंदरावर भीषण आग; दोन मासेमारी नौका जळून खाक; स्थानिक व मच्छीमारांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला; ६५ लाखांच्या नुकसानीची प्राथमिक नोंद

Local Fishermen Prevented a Bigger Disaster: सुमारे ६५ लाखांचे नुकसान झाले असून स्थानिक मच्छीमारांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Anjarle Fishing Boat Fire

Fishing boats engulfed in flames at Anjarle fishing harbour in Ratnagiri

esakal

Updated on: 

दापोली: तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदरावर ग्रामपंचायतीलगत उभ्या असलेल्या मासेमारी नौकांना लागलेल्या भीषण आगीत दोन मासेमारी नौका पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळांनी काही काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. मात्र स्थानिक नागरिक, हर्णे व पाजपंढरी परिसरातील मच्छीमारांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आग इतर नौकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून पोलिस पंचनाम्यामध्ये दोन्ही नौकांचे मिळून ६५ लाखाचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com