

boat sunk in Harnai sea
esakal
राधेश लिंगायत
दापोली: हर्णै समुद्रात आलेल्या वादळात जलसमाधी मिळालेली नौका तब्बल महिनाभरानंतर वाहत वाहत आंजर्ले खाडीत येऊन अडकली आहे. खाडीत शाकारल्या जाणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या नौकांसाठी ही बुडालेली नौका धोकादायक ठरत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने तातडीने लक्ष घालून ही नौका पाण्याबाहेर काढावी, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.