Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

₹5 Crore Approved for Anuskura Ghat Road Repair : रत्नागिरीतील अणुस्कुरा घाट रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला असून २५ किमी रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे.
Anuskura Ghat road repair funding Maharashtra

Anuskura Ghat road repair funding Maharashtra

esakal

Updated on

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेल्या अणुस्कुरा घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून २५ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार (Anuskura Ghat road repair funding Maharashtra) असून, पावसाळ्यापूर्वी डागडुजीचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या मार्गाला आता नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com