रिफायनरी समर्थकांवर बहिष्कार घालणाऱ्यांकडून दिलगीरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राजापूर - रिफायनरीच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला होता म्हणून काही लोकांनी गोठिवरेतील कुटुंबीयांवर बहिष्कार घातला होता. बहिष्कार घालणाऱ्यांनी आपली चूक मान्य केली व यापुढे असा प्रकार होणार नाही,असे आश्‍वासन दिले. त्यामुळे पोलिसांनी सध्या हे प्रकरण सामंजस्याने मिटविले. 

राजापूर - रिफायनरीच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला होता म्हणून काही लोकांनी गोठिवरेतील कुटुंबीयांवर बहिष्कार घातला होता. बहिष्कार घालणाऱ्यांनी आपली चूक मान्य केली व यापुढे असा प्रकार होणार नाही,असे आश्‍वासन दिले. त्यामुळे पोलिसांनी सध्या हे प्रकरण सामंजस्याने मिटविले. 

राजापूर तालुक्‍यातील गोठिवरे येथे राहणारे सूर्यकांत पुजारी, महादेव येरम, व अनाजी खांबल आदी कुटुंबीयांनी त्यांच्यावर गावातील बहिष्कारायाबाबत पोलिसांकडे धाव घेतल्यावर नाटे येथील पोलिस निरीक्षक काळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. बहिष्कार घालणाऱ्यांना समज दिली. 
रिफायनरी समर्थनार्थ मोर्चानंतर गावातील गणपती मंदिरात काही लोकांनी मुंबई येथील लोकांच्या सांगण्यावरून सभा घेतली व ज्या लोकांनी रिफायनरीचे समर्थन केले आहे त्यांच्याकडे कोणीही कामाला जावू नये व त्यांच्याशी बोलू नये असे सांगितले.

जो कोणी या गोष्टीचा भंग करेल त्याचेकडून 5 हजार रूपये दंड आकारण्यात यावा असे ठरविले. या कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वा धार्मिक निमंत्रण देण्यात येवू नये,असा निर्णय घेण्यात आला.

याबाबतची तक्रार लेखी केली. या घरातील लोक रस्त्यावरून जात असता त्यांचे मोबाईलवरून फोटो काढले जातात. या कुटुंबियांनी मंदिरात दिलेले साहित्यही न वापरता तसेच ठेवण्यात आले व या लोकांनी दिलेली वर्गणीसुद्धा स्वीकारण्यात आली नाही. या कुटुंबाकडे कोणीही लोक दहशतीमुळे कामाला येत नसल्यामुळे कुटुंबे एकाकी पडली होती. त्यामुळे काही मुंबईला गेले. उर्वरित कुटुंबे जीव मुठीत धरून रहात होती परंतु या कुटुंबानी या बहिष्कारासारख्या निर्णयाविरोधात पोलिसांकडे दाद मागण्याचे ठरविले. रिफायनरीसाठी समर्थन देणाऱ्या कुटुंबाच्या वतीने या भागातील सामाजिक नेते व रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

दहशतीचे प्रकार इतरत्रही 
रिफायनरी परत यावी यासाठी इतर गावातल्या लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या गावातही असे दहशतीचे प्रकार चालू असल्याचे स्थानिक नेते अविनाश महाजन यांनी सांगितले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apologies to those who boycott refinery supporters