
भारतामध्ये भौगोलिक तसेच हवामानातील विविधतेमुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा धोका कायम असतो. नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंप (हिमालय आणि गुजरातसारख्या भागांमध्ये), पूर (आसाम, बिहार, कोकण, उत्तर प्रदेशातील नदीकाठचे भाग), चक्रीवादळे (ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालसारख्या किनारी राज्यांमध्ये) तसेच दुष्काळ (राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रातील भाग) यांचा समावेश आहे. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन आणि हिमनदी वितळण्यासारख्या समस्या तर समुद्रकिनाऱ्यावर (विशेषतः भारताची पूर्व किनारपट्टी) त्सुनामीचा धोका आहे. याचा अनुभव २००४ मध्ये मिळाला. मानवनिर्मित आपत्तींपैकी औद्योगिक दुर्घटना (१९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेसारख्या) आणि शहरामध्ये लागणाऱ्या आगींचाही धोका आहे. या सर्व आपत्तींचा सामना करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि रिमोट सेन्सिंग या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर कसा होतो, हे समजून घेऊया.
- प्रा. डॉ. वाय. आर. कुळकर्णी,
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल