राजेंद्र पेठकरांच्या नियुक्तीने सेनेत वाद : युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी....

Appointment of Rajendra Pethkar as Dapoli Mayor of Shiv Sena
Appointment of Rajendra Pethkar as Dapoli Mayor of Shiv Sena

दाभोळ (रत्नागिरी) : शिवसेनेच्या दापोली शहरप्रमुखपदावर राजेंद्र पेठकर यांची नियुक्‍ती करण्यात आल्याने तरुण शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्‍त करण्यात आली असून शिवसेनेचेच माजी शहरप्रमुख पप्पू रेळेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या नाराजीला तोंड फोडले असून रेळेकर यांच्या भूमिकेला अनेक शिवसैनिकांकडून पाठिंबा मिळत आहे. 

तालुक्‍यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत दापोली शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायतीपर्यंत कायम सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आले आहे. या संपूर्ण काळात अनेक शहरप्रमुखांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आल्या. यापूर्वी सर्व शहरप्रमुखांच्या नियुक्‍त्या या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन केल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी सातत्याने यश मिळाले. यावेळी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने उपजिल्हाप्रमुखपद भोगलेल्या व सरपंचपदापासून ते नगराध्यक्षपद भोगलेल्या राजेंद्र पेठकर यांची नियुक्ती केली. 


ही निवड करताना विद्यमान शहरप्रमुख व सध्या वैद्यकीय उपचार घेत असलेले शहरप्रमुख सुहास खानविलकर यांनाही विश्वासात न घेता अंधारात ठेवून ही नियुक्ती केली आहे. वरिष्ठांनी हा घेतलेला निर्णय कोणत्याही सामान्य शिवसैनिकांना पटलेला नाही. म्हणून असे कोणतेही निर्णय सामान्य शिवसैनिक स्वीकारणार नाहीत. याचाच एक भाग म्हणून काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिकानी दापोली शिवसेना शहर शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला असून पक्षाने या नियुक्‍तीचा पुनर्विचार करावा व ही नियुक्‍ती रद्द करून गेली अनेक वर्षे असलेल्या परंपरेला अनुसरून नियुक्ती करण्यात यावी व सर्व शिवसैनिकांचे मत शिवसेनेत ग्राह्य धरले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून द्यावे, अशी मागणी पप्पू रेळेकर यांनी केली आहे.  
युवा कार्यकर्त्याला संधी द्यावीआमदार योगेश कदम हे युवा वर्गातील असून त्यांना साथ देण्यासाठी दापोली शहरप्रमुख म्हणून कोणत्याही युवा कार्यकर्त्याला संधी द्यावी, असेही रेळेकर यांचे म्हणणे आहे.
                 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com