शल्यचिकित्सक निवासस्थानाचा किल्लीचा पेच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. निवासस्थानाची किल्ली त्यांच्याकडे असल्याने विद्यमान शल्यचिकित्सकांना हक्काच्या बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्य चिकित्सकाच्या पदासंबंधी वादावर पडदा पडल्यानंतर आता शल्य चिकित्सकांच्या निवास्थानाचा (बंगला) वाद पुढे आला आहे.

तत्कालीन शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांची सोलापूरला बदली होऊन 2 महिने झाले तरी त्यांनी निवास्थान सोडलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यानी बंगल्याची किल्ली न दिल्याने नवीन शल्य चिकित्सकांसमोर पेच निर्माण झाला आहे. शासकीय निवास्थानात नातेवाईक राहात असतील तर त्याचा गैरवापर सुरू आहे, असे म्हणावे लागेल ,अशी माहिती जाणकारांनी दिली. कोणत्या न कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत असलेले जिल्हा शासकीय रुग्णालय आता नव्या वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेल्या कालावधीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून वाद सुरू झाला. शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे असताना त्यांच्या पदभार डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे देण्यात आला. यावरून शल्यचिकित्सक पदाची संगीत खुर्ची सुरू होती. मात्र डॉ. बोल्डे यांची याच काळात सोलापूर येथे बदली करण्यात आली आणि डॉ. फुले यांची रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून आरोग्य विभागाने नियुक्ती केली.

यामुळे हा त्या वादावर पडदा पडला. बोल्डे यांची बदली सोलापूरला झाल्यानंतर 5 ऑक्‍टोबरला त्यांना कार्यमुक्त केले. मात्र दोन महिने झाले तरी अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. निवासस्थानाची किल्ली त्यांच्याकडे असल्याने विद्यमान शल्यचिकित्सकांना हक्काच्या बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानाचा नवा वाद पुढे आला आहे. गेल्या दोन महिन्यात बोल्डे एकदाही रत्नागिरीत आलेले नाहीत. येथे आता कोणीतरी दुसरेच काही दिवसांसाठी राहण्यासाठी आले आहेत. ते बोल्डे यांचे नातेवाईक आहेत वा नाही याची माहिती मिळाली नाही. मात्र बोल्डेऐवजी दुसरे कोणी ते वापरत असेल तर तो शासकीय निवास्थानाचा गैरवापर ठरतो अशी चर्चा सुरू आहे. मात्र सिव्हिलकडे शासकीय बंगल्याची किल्ली जमा केलेली नाही. 

हे पण वाचाआयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला  
 
शिफारशीवरून कोणीतरी राहाते 
धक्कादायक बाब म्हणजे या बंगल्यात बोल्डेंच्या शिफारशीवरून कोणीतरी राहात असल्याचे समजते. त्यामुळे विद्यामान शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी कारवाईच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कार्यवाही होणार की कारवाई हा औत्सुक्‍याचा विषय आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: argument on ratnagiri Surgeon residence