‘आरमार’ स्कूबा डायव्हिंग नौका लोकार्पण; कोकणात लवकरच बिच शॅक्स पॉलिसी - ठाकरे

Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal media

मालवण : पर्यटन विकास महामंडळाच्या इसदा या स्कूबा डायव्हिंग सेंटरला (Scuba Diving Center) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘आरमार’ या अत्याधुनिक स्कूबा डायव्हिंग नौकेचा आपल्याला गर्व असायला पाहिजे. या नौकेचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पर्यटक येथे यावेत. येथील निसर्गरम्य वातावरणाचा (Malvan tourism) मनमुराद आनंद त्यांच्याकडून लुटला जाईल ही खात्री बाळगूनच हा उपक्रम सुरू केला आहे. येथील मंदिरांसाठी स्पिचरल टुरिझम सर्कीट, बीच शॅक्स पॉलिसी, बॅकवॉटर (Back water) सुरू करता येईल का? यावर विचार सुरू आहे. आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्याला पटेल आणि शोभेल असे पर्यटन इथे वाढविणे गरजेचे असून त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज तारकर्लीत केले.

Aditya Thackeray
मोताळा: कार-ऑटोरिक्षाचा अपघात; एक ठार, जखमींना रुग्णालयात केले दाखल

सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तारकर्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटिक स्पोर्टस् (इसदा) या स्कूबा डायव्हिंग सेंटरला उपलब्ध करून दिलेल्या देशातील पहिल्या ‘आरमार’ या अत्याधुनिक स्कूबा डायव्हिंग नौकेचे लोकार्पण आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तारकर्लीत करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गिरीश कांबळे, जलपर्यटन व्यवस्थापक रोहित आयरे, दीपक माने, डॉ. सारंग कुलकर्णी, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Aditya Thackeray
बनावट कागदपत्रांवर बेकायदा इमले! निवडणुकीच्या तोंडावर बांधकामांचा सुळसुळाट

ठाकरे म्हणाले, कोकण हे निसर्गरम्य आहे त्यामुळे येथील निसर्गाला कोठेही हात लावणार नाही. पर्यावरणपूरक वातावरण आहे. हिरवंगार आपले कोकण आहे. त्यामुळे येत्या काळात कृषी पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत. होम स्टे साठी काही धोरणे आखली जात आहेत. यात जे छोटे मोठे होम स्टे आहेत ती वाढण्याची संधी मिळावी. दोन तीन फाईव्हस्टार हॉटेल्स आणण्यात येणार आहे. यात स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. येथे चांगले समुद्रकिनारे आहेत मंदिरे आहेत.

या अनुषंगाने मंदिरासाठीही स्पिचरल टुरिझमचे सर्कीट करत आहोत. त्याचबरोबर किनार्‍यांसाठी काही ठराविक क्षेत्रात किनार्‍याला धोका न पोहचता समुद्री कासव संवर्धन क्षेत्राला हानी होणार नाही अशी बिच शॅक्स पॉलिसी आणली आहे त्यावर अभ्यास सुरू आहे. सीआरझेड, कासव संवर्धन क्षेत्र असेल या नौकेबरोबरच सबमरीनचा प्रस्ताव आला आहे. हाऊसबोट, बॅकवॉटर होऊ शकते का? यावर विचार सुरू आहे. त्यामुळे या जिल्ह्याला शोभेल असेच पर्यटन वाढविण्यावर आपण भर देणार आहोत. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा हा केवळ कागदावरच राहिला असल्याची टीका होत होती मात्र येत्या दोन वर्षात येथील पर्यटनात काय वाढ होती ती तुम्ही पाहा. याची सुरवात या अत्याधुनिक नौकेच्या लोकार्पणाने होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक भूमिपूत्रांचा विरोध होता. शिवसेनेची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. इथे इंडस्ट्री आली पाहिजे. शाश्‍वत विकासाच्या ध्येयाला आपण पकडून पुढे गेले पाहिजे. कुठे प्रदूषण होत असेल आणि स्थानिक भूमिपूत्रांचा विरोध असेल तिथे प्रकल्प होणार नाही. महाराष्ट्रात ती इंडस्ट्री राहिल पण तरीदेखील हा प्रकल्प कुठे नेता येईल याची चाचपणी करून पुढे जात आहोत. जिथून मागणी येईल तसे ते काम पुढे नेले जाईल हा प्रकल्प कुठे करायचा याबाबतची चर्चा सुरू आहे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार, राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था असेल कुठचाही पक्ष सत्तेत असला तरी काम करताना सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून स्थानिक विषय जे असतील तर ते नोंदविले पाहिजेत. दोन्ही बाजूने मते घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. कुठेही लोकशाही ही दूर न करता काम केले पाहिजे. जी काही लोकांची मते आहेत त्याचा मान, सन्मान ठेवूनच काम केले पाहिजे असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com