
संगमेश्वर: कलाकाराचा कुंचल्यात जादू असते. या जादूमागे कलाकाराचे अथक परिश्रम दडलेले असतात. जेवढा सुंदर निसर्ग असतो तेवढीच सुंदर कलाकृती साकारण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे गावचे प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी त्यांच्या जादूई कुंचल्यातून चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथील सुंदर निसर्ग आपल्या कलाकृतीत साकारला आहे.