
मालवण : ‘‘येथील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट किल्ल्यांचा इतिहास शिवप्रेमींसमोर यावा, यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अध्ययन केंद्र मालवणात उभारले जाईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यकता भासल्यास आणखी निधीची तरतूद करू,’’ अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केली.