

Ashtavinayak Temple Bodies Seek SIT for Land Protection and Investigation
Sakal
पाली : देवस्थानांच्या हजारो एकर शेत जमिनी भूमाफियांनी हडपल्या आहेत. या जमिनींच्या संरक्षणासाठी गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर कठोर असा अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा लागू करून एसआयटी स्थापन करा या मागणीचे निवेदन मंगळवारी अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पाली - सुधागड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.