

Pali’s Ballaleshwar Temple sees festive devotion
sakal
पाली : संकष्टी चतुर्थी निमित्त श्री. बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिरा बाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.