अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी सावित्री नदीत विसर्जीत

सुनील पाटकर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

म्हसळा येथून कै अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आ प्रविण दरैकर हे महाड येथे घेऊन आले. महाड बाडारपेठेतून सदर कलश छ शिवाजीमहाराज चौक येथे सर्वांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिल्लीतून 14 अस्तिकलश महाराष्ट्रात आणले होते. पैकी दोन कलश रायगड जिल्हातील कर्जत येथील उल्हास नदी आणि महाड येथील सावित्री नदीत विसर्जीत करण्यात आले.  दरम्यान महाड मधील शासकीय अधिकारी, वकिल, डाँक्टर्स, व्यापरी आणि नागरीकांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिंचे दर्शन घेतले. 'अटलबिहारी अमर रहे' अशा घोषणा देत सायंकाळी हा अस्थिकलश नडगाव येथे काळ आणि सावित्री या नद्यांच्या संगमावर नेण्यात आला. या ठिकाणी सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. रविंद्र चव्हाण यांनी आपला भारत देश महासत्ताक व्हावा हे अटलजीचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगितले.या प्रसंगी आ प्रविण दरेकर, आ भरत गोगावले, भाजप उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले, भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,तहसिलदार चंद्रसेन पवार उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atal Bihari Vajpayee's ashes in Savitri River