त्याने केला सख्या भावावरच चाकूने हल्ला अन्..... 

Attack on brother with knife kokan marathi news
Attack on brother with knife kokan marathi news
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : घराबाहेर जाण्यासाठी दुचाकीची चावी दिली नाही, म्हणून सख्ख्या भावावर एकाने चाकूचा हल्ला केला. ही घटना  दादर देऊळवाडी येथे घडली.याबाबत अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार

सागर चव्हाण याने आपला भाऊ प्रवीण चव्हाण याच्यावर चाकूने हल्ला केला आहे. प्रवीण याने पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार सागर हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने प्रवीणकडे दुचाकीची चावी मागितली. मात्र, पेट्रोल पंप बंद असल्यामुळे आणि दुचाकीवर बंदी असल्यामुळे प्रवीण याने सागरला दुचाकीची चावी दिली नाही. त्याचा राग मनात धरून सागरने प्रवीणला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

देऊळवाडी येथील घटना

सागरला राग आला. यातून त्याने दारुच्या नशेत खिशातील चाकू काढून प्रवीणच्या मानेवर वार केला. यात प्रवीण हा जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्याला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर सागर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याला सायंकाळी उशिरापर्यंत अटक झाली नव्हती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com