महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत 'हे' नाटक प्रथम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नेहरु युवा कलादर्शन नाट्य मंडळाच्या "एक्‍स्पायरी डेट' नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्राद्वारे केली.

रत्नागिरी - 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या "अवघड जागेचं दुखणं' या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

नेहरु युवा कलादर्शन नाट्य मंडळाच्या "एक्‍स्पायरी डेट' नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्राद्वारे केली. 

निकाल असा

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक- ओंकार पाटील (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय-गणेश राऊत (एक्‍स्पायरी डेट), प्रकाश योजना : प्रथम- राजेश शिंदे (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय- साईप्रसाद शिर्सेकर (या व्याकुळ संध्यासमयी), नेपथ्य : प्रथम गजानन पांचाळ (एक्‍स्पायरी डेट), द्वितीय-प्रवीण धुमक (या व्याकुळ संध्यासमयी), रंगभूषा : प्रथम-प्रदीप पेडणेकर (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय नितीन मेस्त्री (सगळो गांव बोंबालता), उत्कृष्ट अभिनय ः रौप्यपदक-स्वानंद देसाई (अननोन फेस) व तृप्ती राऊळ (चाहूल), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- ऋचा मुकादम (अवघड जागेचं दुखणं), अर्चना पेणकर (एक्‍स्पायरी डेट), तनया आरोलकर (मी स्वामी या देहाचा), भावना रहाटे (आता उठवू सारे रान), पूजा जोशी (धुआँ), अनंत वैद्य (काळे बेट लाल बत्ती), सुशांत पवार (दी ग्रेट एक्‍सचेंज), शरद सावंत (चाहूल), जयप्रकाश पाखरे (एक्‍स्पायरी डेट), योगेश हातखंबकर (फेरा).  18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी आणि मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे एकूण 21 नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शशिकांत चौधरी, ज्योती केसकर आणि गजानन कराळे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे. 

हेही वाचा - नीलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर हाच मुद्दा आणणार पण आम्ही... 

"काळे बेट लाल बत्ती' नाटक तृतीय स्थानी 

"अवघड जागेचं दुखणं' व "एक्‍स्पायरी डेट' या दोन्ही नाटकांच्या अंतिम फेरीसाठी ही निवड करण्यात आली आहे. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ या संस्थेच्या "काळे बेट लाल बत्ती' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

हेही वाचा - गाव - शिवाराला पारखी झाली फुलपाखरं, पण कशामुळे ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avghad Jageche Dukhane First In Maharashtra Marathi Drama Competition