आम्ही वैरी नाही, राजकीय प्रतिस्पर्धी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून शिकले पाहिजे. सेना ही आदेश मानणारी संघटना आहे, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केले. 

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या ‘आलेख जनसेवेचा’ या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सामंत यांच्याविषयी भावना व्यक्त केली.  प्रसन्न आंबुलकर म्हणाले, बॅडमिंटन कोर्टासह स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी सामंत नेहमी तत्पर राहतात.  ॲड. पाटणे म्हणाले, जनतेचा सहभाग आणि लोकशाही बळकटीचे हे लक्षण आहे. पक्ष अभिनिवेश न ठेवता ते सर्वांची कामे करतात. केलेल्या विकासकामांचा कधीच गाजावाजा करत नाही.

अरुअप्पा जोशी ॲकॅडमीला त्यांनी १० लाख दिले. आता आयएएस आणि यूपीएससीमध्ये कोकणात विद्यार्थी येत नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याची गरज आहे. रमेश कीर म्हणाले, पंधरा वर्षांमध्ये उदयचा संपर्क प्रचंड वाढला आहे. कुटुंबाबरोबर त्यांच्या टीमचा त्याला चांगला पाठिंबा आहे. ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले, तीन वेळा निवडून येण्याबद्दल सामंत यांचा गौरव करावासा वाटतो. आजपर्यंत आम्ही विरोधातच काम केले. निवडणूक संपल्यावर मैत्री कायम आहे. सामंत यांना आमची भक्कम साथ राहील.

कॅ. दिलीप भाटकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, डॉ. अलिमिया परकार, उद्योजिका ऊर्मिला घोसाळकर, डॉ. रमेश चव्हाण यांनीही सामंत यांचे कौतुक केले.

कोकण विद्यापीठाची मागणी लावून धरा 
डॉ. सुभाष देव म्हणाले, उदयने शासनाच्या प्रत्येक विभागात काम केले आहे. मात्र रत्नागिरी शहर विद्रूप होत आहे. शहरात कधी पाणी साठत नव्हते ते साठत आहे. रत्नागिरीचे शिमला शहर करा. सुशिक्षिताना रोजगार मिळत नाही. तरुण वर्ग स्थलांतरित होत आहे. पुढील २० वर्षांमध्ये शहरात सर्व म्हातारी माणसं राहतील, अशी परिस्थिती आहे. पर्यटकांना रत्नागिरीत थांबून ठेवण्यासाठी सुविधा देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. चौथ्या पर्वात कोकण विद्यापीठाची मागणी लावून धरा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bal Mane comment on Uday Samant