Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Sasoli Land Scam : पिंगुळी पाझर तलाव आणि सासोली जमीनप्रकरणावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला.
MNS leader Bala Nandgaonkar warns the administration over the Pinguli lake and Sasoli land disputes.

MNS leader Bala Nandgaonkar warns the administration over the Pinguli lake and Sasoli land disputes.

esakal

Updated on: 

बांदा, : परराज्यातील धनदांडग्यांना आणून स्थानिकांवर राजकीय दबाव आणत महाराष्ट्र पोखरण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. पिंगुळी पाझर तलाव आणि सासोली येथील जमीन घोटाळा हा त्याचाच भाग असून, स्थानिक जनतेवर होणारी ही दादागिरी मनसे कदापि खपवून घेणार नाही. विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा, अन्यथा मनसेला कायदा हातात घेऊन ‘खळखट्याक’ करावा लागेल, असा थेट इशारा मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी दिला.

Loading content, please wait...