Ballaleshwar Temple: पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; हॉटेल, दुकाने फुलली, रस्त्यांवर वाहतूक कोंडी

Diwali Crowd Boosts Business but Causes Traffic Jams in Pali: पालीत भाविकांचा महापूर! दुकाने आणि हॉटेल गजबजली; अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
Diwali Holidays Bring Heavy Devotee Rush to Ballaleshwar Temple in Pali Causing Traffic Congestion on Narrow Roads

Diwali Holidays Bring Heavy Devotee Rush to Ballaleshwar Temple in Pali Causing Traffic Congestion on Narrow Roads

esakal

Updated on: 

पाली: दिवाळी सुट्यांमध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पालीत भाविकांची मोठी रेलचेल सुरू झाली आहे.  शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या अजूनकाही दिवस असल्यामुळे पालीत भाविकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे येथील हाॅटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजीत आला आहे. मात्र भाविकांच्या व इतर वाहनांमूळे पालीत वाहतुक कोंडी वाढत आहे.

Loading content, please wait...