Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Banda Gram Sabha Opposes Shaktipeeth Highway : बांदा ग्रामसभेत नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला एकमुखी विरोधाचा ठराव मंजूर झाला. २१४ एकर जमीन आणि श्रद्धास्थान बाधित होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी भूसंपादनावर तीव्र आक्षेप नोंदवला.
Shaktipeeth Highway latest news

Shaktipeeth Highway latest news

esakal

Updated on

बांदा : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला येथील ग्रामस्थांचा कोणताही फायदा होणार नसून, या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा एकमुखी विरोध असल्याचा ठराव येथील ग्रामसभेत आज मंजूर करण्यात (Shaktipeeth Highway 214 acres land Banda) आला. अधिसूचना ग्रामपंचायतीमध्ये लावली असली तरी आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर ती लावल्याने आक्षेप आता कुठे नोंदवायचा, असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com