esakal | भाजीपाला व्यापाऱ्याला पोलिसांकडू बेदम मारहाण

बोलून बातमी शोधा

Beating by police Business man sindudurg

गाडीची सर्व कागदपत्रेही होती आणि भाजीपाला वाहतुकीचा प्रशासनाने दिलेला वैध ई पासही होता. तरीही त्यांना अडवून  ड्युटीवर असलेल्या चारपैकी एका पोलिसाने त्यांना दांडा फुटेपर्यंत अमानुष मारहाण केली. जवळपास दोन तास त्यांना मारहाण करत अडवून ठेवण्यात आले होते.

भाजीपाला व्यापाऱ्याला पोलिसांकडू बेदम मारहाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग येथील भाजी व्यापारी संजय जाधव यांना आज पहाटे दोनच्या दरम्यान शिरगाव फाट्यावर चंदगड पोलिसांकडून नाहक बेदम मारहाण करण्यात आली. जाधव यांच्यासोबत चालक बाळू खांबल होते. त्यांचे लायसन्स होते. गाडीची सर्व कागदपत्रेही होती आणि भाजीपाला वाहतुकीचा प्रशासनाने दिलेला वैध ई पासही होता. तरीही त्यांना अडवून  ड्युटीवर असलेल्या चारपैकी एका पोलिसाने त्यांना दांडा फुटेपर्यंत अमानुष मारहाण केली. जवळपास दोन तास त्यांना मारहाण करत अडवून ठेवण्यात आले होते.नत्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्या अमानुष मारहाणीचा दोडामार्गवासियांनी निषेध केला आहे.

हे पण वाचा - ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडला कोरोनाचा आणखी एक रूग्ण

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रशासनाने ई पास दिले आहेत. भाजीपाला वाहतूक अत्यावश्यक सेवा आहे. त्यासाठीचा ई पास जाधव यांनी काढला होता. त्यांनी गडहिंग्लज सीमेवर कर्नाटकमधून आलेली भाजी आपल्या मिनी टेंपोत भरली आणि ते दोडामार्गकडे यायला निघाले. शिरगाव फाट्यावर चार पोलिस होते. त्यांच्या मागणीनुसार त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवली. पण त्यातील एका पोलिसाने उलसुलट प्रश्न विचारत शिवीगाळ करून जाधव यांना मारहाणही केली, अशी माहित जाधव यांनी दिली. यावेळी जाधव यांनी पाणी मागितले तर त्यांना पाणी देण्याचे सौजन्यही चौघांपैकी एकानेही दाखवले नाही. मारहाण आणि शिवीगाळ मात्र एकच पोलिस करत होता त्यासंदर्भात जाधव यांनी दोडामार्ग पोलिसात तक्रार करण्यााचा प्रयत्न केला पण पोलिस निरीक्षक सुनील थोपटे बाहेर गेले होते.

हे पण वाचा - आमची कोणतीही चाचणी घ्या पण आम्हाला घरी जाऊ द्या ओ... -

दरम्यान, पोलिसांच्या त्या अमानवीय कृबद्दल तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लॉकडाऊन तोडून कोणी मजेसाठी फिरत असेल तर कारवाईचे समर्थन करता येईल, पण अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या आणि नियमानुसार वागणाऱ्याला अशी बेदम मारहाण होत असेल तर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी , ती झाली नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले.

पोलिस निरीक्षकांकडून कारवाईची ग्वाही 

चंदगड पोलिस निरीक्षक ए. एन. सातपुते यांच्या कानावर झाला प्रकार घातला. त्यावर या प्रकाराची काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय  संबधित घटनेची चौकशी करुन दोषी पोलिसावर कारवाई करण्याची ग्वाही दिली.