ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडला कोरोनाचा आणखी एक रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

या महिलेबाबत अधिक माहित अद्याप मिळाली नाही. तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या संर्पकात कोण कोण आले आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहे. ही महिला राहात असलेला परिसर पोलिसांनी बंद केला असून या परिसरातील कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरी - रत्नागिरीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. साखरतर येथील हा महिला रुग्ण आहे. या महिलेचे वय ५२ वर्ष असून आहे. काल जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आज आला असून त्यामधील या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडला कोरोनाचा आणखी एक रूग्ण

या महिलेबाबत अधिक माहित अद्याप मिळाली नाही. तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या संर्पकात कोण कोण आले आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहे. ही महिला राहात असलेला परिसर पोलिसांनी बंद केला असून या परिसरातील कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमाचा कोण भंग केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. 

हे पण वाचा - रत्नागिरीच्या महत्वाकांक्षी पाणी योजनेला लॉक डाऊनचा फटका... 

दरम्यान, जिल्ह्यातील हा कोरोनाचा तिसरा रूग्ण आहे. परंतु, यातील पहिल्या रूग्णाचा अहवाल गेल्या काही दिवसांपूर्वीच निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सद्या तरी जिल्ह्यात दोनच रूग्ण आहेत. प्रशासनाने आतापर्यंत सर्व प्रकारची खबरदारी घेतली असून यापुढेही विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more corona positive patient in ratnagiri