
-धनंजय चितळे
बरेच वेळा संत कोणाला म्हणावे हा प्रश्न आपल्याला पडतो. संतांच्या बाह्य पेहरावावरून आपण त्या संतांची परीक्षा करायला जातो आणि फसतो. शक्तीपात संप्रदायाचे महान सत्पुरुष परमहंस परिव्रजकाचार्य श्री लोकनाथतीर्थ स्वामीमहाराज असे म्हणत की, हम तो साधू मनही के, तनके कुछ और! अर्थात, आम्ही अंतरंगाने साधू आहोत. बाह्य लक्षणावरून काही वेगळे दिसले तरी! समर्थ रामदास स्वामी उपदेश करताना म्हणतात