शिवसेनेत झालेली गद्दारी भाजप पुरस्कृत; अनंत गीतेंचा आरोप

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करत आहेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर गीते यांनी केली.
Anant Gite
Anant GiteSakal
Summary

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करत आहेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर गीते यांनी केली.

पाली - शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही अशी परखड टीका अनंत गीते यांनी केली. गुरुवारी (ता.29) पालीतील माजी केंद्रीय मंत्री भक्तनिवास क्रमांक एक मध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी गीते बोलत होते.

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करत आहेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर गीते यांनी केली. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांची पर्वा करू नका, आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, शिवसेना आमच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गद्दारांना माफी नाही.

आता कोकणातील पाच गद्दारांना कायमचे मातीत गाडणार आहे. आज मुंबई महानगरपालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजप ही धुळीस मिळेल असे गीते म्हणाले. शिवसेना बुलडोजर आहे, जे जे पायाखाली येतील ते यावर्षी च्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होईल की चार चार शिवाजी पार्क कमी पडतील. अनंत गीते म्हणाले माझं वय 72 आहे, मात्र आमदारांनी गद्दारी केली म्हणून माझं वय आता 27 झालय. आज केवळ शिवसेनेवर संकट नाही तर संपूर्ण भारत देशावर संकट आहे. आज लोकशाही संकटात आहे, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल हा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे गीते म्हणाले.

जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की बंडखोर आमदारांनी दिलेली कारणे म्हणजे केवळ दिशाभूल करणारी आहेत. केवळ पैशांसाठी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. भाड्याने घरात राहणारे भाडोत्री मालक होऊ शकत नाहीत.

उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आज गद्दारांना पुन्हा गाडण्याची वेळ आलीय. असे राऊत म्हणाले. शिवसैनिकांनो आत्ता पेटून उठा, शिवसैनिकांच्या भक्कम पायावर आज ज्यांना मोठमोठी पदे दिली ते लोक आज योगदान विसरले. आज त्यांना जागा दाखवण्याची वेळ आलीय असे राऊत म्हणाले.

या मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ सल्लागार जिल्हा समन्वयक किशोर जैन,माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राउत, महिला जिल्हा संघटक दिपश्री पोटफोडे, सहसंपर्क प्रमुख नरेश गावंड, जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे,पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, मुंबई नगरसेवक दत्ता पोंगडे, दिनेश चिले, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com