esakal | 'वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा'; राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagat Singh Koshari

देशात दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून धान्य आयात करण्याची वेळ आलेल्या आपल्या देशाने कृषी उत्पादने निर्यात करणारा देश म्हणून ख्याती मिळवली आहे

'वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा'; राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ : शेती करणे हे जगातील सर्वोत्कृष्ट काम असून कृषी पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमाद्वारे एक नवी क्रांती आणून देशाला दिशा देत जीवनात, देश-विदेशात नाव कमवावे, स्वउद्योग स्थापून शासकीय योजना कृतीत उतरवत वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

हेही वाचा: राज्यपाल नियुक्त आमदारकी यादीतून वगळले? शेट्टींचा मोठा 'खुलासा'

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीदान समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विद्यापरिषदेचे सदस्य व कुलसचिव डॉ. भरत साळवी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. धवन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर व परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विश्वनाथा उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘देशात दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून धान्य आयात करण्याची वेळ आलेल्या आपल्या देशाने कृषी उत्पादने निर्यात करणारा देश म्हणून ख्याती मिळवली आहे. वैदिक काळातही आपला देश कृषी व कृषी आधारित उद्योगांमुळे समृद्ध होता. त्यामुळे नवे तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण यंत्रे वापरून अन्नधान्याची उत्पादकता वाढविली पाहिजे.' आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत 'उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी' या संकल्पनेचा उहापोह करत शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार

loading image
go to top