esakal | राज्यपाल नियुक्त आमदारकी यादीतून वगळले? शेट्टींचा मोठा 'खुलासा'
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल नियुक्त आमदारकी यादीतून वगळले? शेट्टींचा मोठा 'खुलासा'

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याच्या वृत्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता पसरली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारकी यादीतून वगळले? शेट्टींचा मोठा 'खुलासा'

sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकी सध्या डोक्यात नाही. यादीतून आपल्याला वगळले याबाबत अद्याप अधिकृत कळवले नसल्याचा खुलासा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याच्या वृत्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता पसरली आहे. पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांचे सध्या आंदोलन सुरू आहे. थेट राज्य शासनाविरोधात त्यांनी दंड थोपटल्याने महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Sarkar) नाराजीचा सूर असताना, राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून डच्चू मिळाल्याने महाविकास आघाडी आणि शेट्टी यांच्यातील संबंध ताणल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारनं लोकांना मारुन टाकायचं ठरवलंय का?' राणे खवळले

यावर शेट्टी म्हणाले, २०१७ ला महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. यात महाविकास आघाडीतून राज्यपाल नियुक्त आमदारकीची एक जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता. गतवर्षी राज्यपाल नियुक्त आमदारांचा कार्यकाल संपला. मात्र, केंद्रात एक आणि राज्यात दुसरे सरकार यामुळे नव्याने निवडीला विलंब झाला असावा. मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) स्वतः शरद पवार यांचा निरोप घेऊन घरी आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी मी स्वतः इच्छुक असावे असाही आग्रह धरला. यानंतर बारामतीला येण्याबाबत निमंत्रण दिले.

बारामतीत शरद पवार यांनी पाहुणचार केला होता. यानंतर आम्ही आमदारकीची विचारणा केली नाही. पुरग्रस्तांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू असतानाच तांत्रिक मुद्याचा विषय समजला, पण याबाबत अधिकृत माहिती नाही. आमदारकीपेक्षा सध्या मला पुरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

loading image
go to top