
Bhagwan Ahire’s inspiring success: Modern farming technology and hard work turn barren land into a lush green paradise.
Sakal
-अमित गवळे
पाली : रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेती नापीक व ओसाड आहे. मुबलक पर्जन्यवृष्टी होऊनही येथे केवळ भात शेती केली जाते. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक म्हणजे शेती तोट्यातच आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोलादपूर तालुक्यातील डोंगरावर वसलेल्या गोवेले गावातील प्रयोगशील शेतकरी भगवान कोंडीराम अहिरे (वय 55) यांनी आधुनिक तंत्रज्ञान व मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतीमध्ये नंदनवन फुलवले आहे. सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन सुद्धा ते करत आहेत.