या घटनेवेळी अन्य वाहन तेथे नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताचे वृत्त समजताच फोंडाघाट येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कणकवली : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अवघड वळणावरून थेट रस्त्यावर कोसळलेला पेट्रोलवाहू टँकर (Petrol Tanker Accident) पेटला. अपघातानंतर लगेचच स्फोट झाला. यावेळी चालकाने टँकरमधून बाहेर येऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र क्षणार्धात आग भडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अग्निशमन बंब (Firefighter Bomb) रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी दाखल झाले.