esakal | भास्कर जाधव-सुनील तटकरेंमध्ये मिश्कील टोलेबाजी अन् कार्यकर्त्यांचा हास्यकल्लोळ
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaskar Jadhav and Sunil Tatkare on one status in chiplun

आमदार भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली तरी त्यांच्या मतदार संघात कामथे येत असल्याने त्यांना खास निमंत्रण होते.

भास्कर जाधव-सुनील तटकरेंमध्ये मिश्कील टोलेबाजी अन् कार्यकर्त्यांचा हास्यकल्लोळ

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेकाळचे सहकारी खासदार सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव दिर्घकाळानंतर एकाच व्यासपिठावर आले. या दोघांतील सुप्त संघर्ष जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. त्यामुळे दोघे एकाच व्यासपिठावर आल्याने मिश्कील टीका टिपणीने हास्यकल्लोळ रंगला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिर्घकाळानंतर दोघांतील मिश्कील टोलेबाजीने हास्यकल्लोळाचा आस्वाद घ्यायला मिळाला. निमीत्त होते कामथे उपजिल्हा रूग्णालयातील ड्युरा सिलेंडर ऑक्सीजन प्रणाली लोकार्पण सोहळ्याचे. 

आमदार भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली तरी त्यांच्या मतदार संघात कामथे येत असल्याने त्यांना खास निमंत्रण होते. सुरवातीला भाषणात आमदार जाधवांनी कामथे रूग्णालय  व प्रशासनाचे कौतुक केले. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. खेडला अजित पवार यांनी अत्याधुनिक कार्डीयाक रूग्णवाहीका दिली. चिपळूणच्या जनतेनेही तटरेंवर खूप प्रेम केले आहे. येथेही त्यांनी ही रूग्णवाहीका मिळण्यासाठी प्रयत्नशील रहावे. त्यांच्या उदघाटनासाठी देखील तटकरेंनी यावे, असे आवाहन केले. हे सांगतानाच त्यांनी तटकरे साहेब माझ्यावर टोलेबाजी करतील असे सुतोवाच देखील केले. नंतर तटकरेंनीही भाषणात मिश्कील टोमण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांवर टीका टिपणी न करण्याचे पथ्य पाळले आहे. जाधवांचा आक्रमक स्वभाव पाहता ते  हे पथ्य पाळतील की नाही हे सांगणे कठीण आहे. जाधवांना मी गेल्या 25 वर्षापासून चांगलाच ओळखतो आहे. चिपळूणसाठी देखील अत्याधुनिक रूग्णवाहीका मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. मध्येच आमदार जाधवांनी कामथे रूग्णालय कोवींड सेंटर प्रकल्पात प्रांताधिकार्‍यांनी मोठे योगदान दिल्याचे सांगितले.

हे पण वाचाआजऱ्यात हत्ती, गव्यांकडून सहा वर्षात चौपट नुकसान 

त्यावरून तटकरे मिश्कील हास्य करीत म्हणाले, प्रांत पवार व तहसीलदार सुर्यवंशी दोघेही श्रीवर्धनहून चिपळूणला आले. ते दोघेही चांगले काम करणाच. आमदार जाधव आक्रमक स्वभावाचे आहेत. आता जाधवांनी विषय काढल्याने प्रांताधिकार्‍यांनी नेहमी बोटात ऑक्सीमिटर घालून ऑक्सीजनची पातळी मोजावी लागेल. तसेच त्यांना तापमान मोजण्यासाठी गणही घ्यावी लागेल. अशी सारी मिश्कील टिपणी झाल्याने एकच हास्यकल्लोळ झाला. जाधव व तटकरे एकमेंकावर जाहीर आरोप आणि टोलेबाजी करीत नसले तरी त्यांच्यातील सुप्त संघर्ष हा यानिमीत्ताने पहायला मिळाला.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top