आजऱ्यात हत्ती, गव्यांकडून सहा वर्षात चौपट नुकसान

रणजित कालेकर
Wednesday, 14 October 2020

आजरा तालुक्‍यात हत्ती, गवे या वन्यप्राण्यांकडून नुकसान हे नित्याचेच बनले आहे. या नुकसानीचे पंचनामे वनविभागातर्फे दररोज केले जात आहेत. त्यातून संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली जाते.

आजरा : आजरा तालुक्‍यात हत्ती, गवे या वन्यप्राण्यांकडून नुकसान हे नित्याचेच बनले आहे. या नुकसानीचे पंचनामे वनविभागातर्फे दररोज केले जात आहेत. त्यातून संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली जाते. गत सहा वर्षात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा आलेख वाढतच चालला आहे. या वर्षात नुकसान भरपाईची रक्कम चौप्पट झाली आहे. हत्ती, गवे व वन्यप्राण्यांच्याबाबत ठोस उपाय योजना न केल्यास लाखात असणारी नुकसान भरपाई कोटीच्या घरात पोहचणार आहे. या वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेली प्रकरणांची संख्या सुध्दा दुप्पट झाली आहे.

 या वर्षी गव्याची 1 हजार 403 प्रकरणे व हत्तीच्या 407 प्रकरणांतून 88 लाख 71 हजार 712 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. सन 2014 - 15 या वर्षी गव्यांच्या 340 व हत्तींच्या 484 अशा एकूण 824 प्रकरणासाठी 19 लाख 16 हजार 494 रुपयांची रक्कम अदा केली. सन 2015-16 साठी 41 लाख 62 हजार 197. सन 2016-17 साठी 54 लाख 80 हजार 164. सन 2017-18 साठी 74 लाख 73 हजार 118. सन 2018-19 साठी 72 लाख 63 हजार 538. इतक्‍या रक्कमेचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. 

2020-21 मध्ये 586 प्रकरणांसाठी 41 लाख 11 हजार 183 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, तर ऑक्‍टोंबर 2020 मधील नुकसानीसाठी 477 प्रकरणांचे 23 लाख 18 हजार 815 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. 

भरपाईची कोटीची उड्डाणे 
कधीकाळी वन्यप्राण्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीसाठी तुटपुंजी भरपाई मिळत होती. सततच्या पाठपुराव्यामुळे या रक्कमेत वाढ झाली आहे. तसेच हत्ती व गव्यांकडून तालुक्‍यात मोठ्याप्रमाणावर नुकसान सुरूच आहे. त्यामुळे काही हजारात असणारी नुकसान भरपाईची रक्कम सध्या लाखात वितरीत केली जाते. ती आता कोटींची उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. सध्याचे नुकसान पाहता. ही भरपाई कोटीची उड्डाणे करण्याची शक्‍यता आहे. 

 

संपादन -सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased Crop Damage In Ajara Taluka Kolhapur Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: