रत्नागिरीत भोंदू बाबाने जमवली माया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

रत्नागिरी - शहरात आणखी एका भोंदू साधूने आपले बस्तान मांडले आहे. तुमची कोणतीही समस्या असेल, तर तीन महिन्यात साधूच्या प्रभावाने ती दूर होईल. त्यासाठी तुम्हाला दोन हजारांपासून २५ हजारांपर्यंतची दक्षिणा साधूबाबाकडे ठेवावी लागते. तुम्हाला फरक नाही जाणवला तर तीन महिन्यांत पैसे परत करू, अशी हमी साधू देतो.

रत्नागिरी - शहरात आणखी एका भोंदू बाबाने आपले बस्तान मांडले आहे. तुमची कोणतीही समस्या असेल, तर तीन महिन्यात बाबांच्या प्रभावाने ती दूर होईल. त्यासाठी तुम्हाला दोन हजारांपासून २५ हजारांपर्यंतची दक्षिणा बाबांकडे ठेवावी लागते. तुम्हाला फरक नाही जाणवला तर तीन महिन्यांत पैसे परत करू, अशी हमी साधू देतो. प्रत्यक्षात मात्र अनेकांची रक्कम थकवून त्याने प्रचंड माया गोळा केल्याची चर्चा आहे. एका तरुण राजकीय पुढाऱ्याचा त्याला कृपाशीर्वाद असल्याचे समजते. 

काही महिन्यांपासून या बाबांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला आहे. किरकोळ प्रभावाला बळी पडून अनेकांनी या बाबांचे पाय धरायला सुरवात केली आहे. घरगुती समस्यांपासून नोकरी, व्यवसाय, आदीवर तो बाबा प्रभावी तोडगा देतो. तीन महिन्यांत तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. 

तुमची समस्या दूर होईल, असा विश्‍वास हा भोंदुबाबा देतो. काही वर्षांपूर्वी कोकणचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबर फिरणाऱ्या मात्र सध्या राजकारणापासून अलिप्त असल्याचे भासविणाऱ्या एका तरूणाच्या घरी तो उतरत असल्याची जोरदार चर्चा आहे. शहरासह परिसरातील अनेकांना या बाबांची भुरळ पडली आहे. त्यांच्या दर्शनासाठी भक्त तिष्ठत आहेत. अनेक समस्यांने ग्रासलेल्यांनी बाबाकडे धाव घेतली. 

तीन महिन्यांनंतर रक्कम परत मिळणार...
भोंदुबाबाने तीन महिन्यांचा प्रभाव देऊनही काहीच फरक पडला नाही. अखेर अनेक भक्तांनी दोन, पाच, १० ते २५ हजारांपर्यंतची दक्षिणा भोंदुबाबाला दिली होती. तीन महिन्यांनंतर रक्कम परत मिळणार, या आशेने अनेक भक्तांनी बाबांकडे पैसे परत मागितले आहेत. मात्र, बाबाने हातवर करीत हजारोची माया गोळा गेल्याची चर्चा आहे. नागरिकांनी अशा भोंदू बाबांच्या गर्तेत अडकू नये, असे आवाहन फसलेल्या काहींनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhodu Baba in Ratnagiri collects money