विकासातूनच मने जिंकू ः पालकमंत्री सामंत

Birthday celebration Minister Uday Samant Kankavli konkan sindhudurg
Birthday celebration Minister Uday Samant Kankavli konkan sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) - राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. 
कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने येथील श्रीधर नाईक चौकात श्री. सामंत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी श्री. सामंत बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळकर, संजय आग्रे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, सुशांत नाईक, शैलेश भोगले, संदेश पटेल, गितेश कडू रामू विखाळे, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, राजू राणे, नीलम सावंत, मंगेश सावंत, हर्षद गावडे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, माही परूळेकर, साक्षी आमडोस्कर, राजू राणे, राजू राठोड, सुजित जाधव, राजू शेट्ये, दिगंबर पाटील व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यापुढे आधी सिंधुदुर्गात वाढदिवस 
सामंत म्हणाले, 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर वाढदिवस रत्नागिरी जिल्ह्यात साजरा झाला होता. रत्नागिरी कर्मभूमी असली तरी आज पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मभूमीमध्ये वाढदिवस साजरा होत आहे, याचे समाधान आहे. पुढील वर्षभरात या जिल्ह्यात सांघिकपणे एवढे काम करूया, की पुढील वर्षी आधी सिंधुदुर्गमध्ये वाढदिवस साजरा करू. मग रत्नागिरीत जावू. येथील स्व. श्रीधर नाईक पुतळ्याच्या समोर सत्कार सोहळा होत आहे. त्यांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले ते सर्वांनी पूर्ण करूया हीच त्यांना आदरांजली, असेही ते म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com